
उर्मिला च लग्न झालं.. एका गावी. उर्मिलाच्या सासऱ्यांनी मोठ्या दिमाखात तो सोहळा लग्न सोहळा संपन्न केला,आणि उर्मिलाच्या आयुष्याची नवी वाट सुरू झाली.. इथून पुढची वाटचाल तर होणार आहे.. एकमेकांच्या साथीने सामंजस्याने, शांततेच्या मार्गाने पण.. आज काय झालं.. एकाएकी उर्मिलाच्या डोक्यावर आभाळ कोसळलं.
उर्मिलाच्या माहेरचा परिवार छोटा, चार बहिणी, एक भाऊ ,आई वडील आणि चार-पाच जण त्यांच्या नातेवाईकातली एवढाच काय तो परिवार होता. सहज म्हणून घरी फोन करावा असं उर्मिलाला वाटलं आणि आणि बघते तर काय फोन कोणाचेच लागत नव्हते, वयाच्या पंचविसाव्या वर्षी उर्मिलाचं लग्न करून दिलेल्या उर्मिलाच्या आई-वडिलांनी तिचं माहेरचं घर तिच्यासाठी बंद करून टाकलं होतं? त्याला कारणीभूत काहीही कारणं असतील, पण आज उर्मिलाचं माहेरचं घर तिच्यासाठी बंद होतं, आणि ती एक माहेरची न दिसणारी वाट आज तिच्यापुढे झाली होती.उर्मीलाने सखोल विचार केला.. तर तिच्या लक्षात आले वडिलांनी मिळवलेल्या जमिनीच्या वादापाई हे सगळं घडवून आणलं गेलं..
ऊर्मिलाला आठवते ती बारावीत असताना भावाचं अन तिचं छोट्या कारणावरून भांडण काय झालं भावाने तिच्याबरोबर बोलणं टाकलं,तिनं त्यानंतर कितीवेळा विनवूनही भावाने खडसावून सांगितले “मला बोलायचच नाहीये” आणि याचा आधिच हळव्या,भोळ्या,कुटुंब वत्सल,सात्विक असणार्या उर्मिलावर कोणं परिणाम झाला..घरात नवसाचा असल्याने भाऊ सर्वांचा लाडका होता आणि आता तोच ऊर्मिलाचा द्वेष करू लागल्याने तिचे फार हाल होऊ लागले आणि याचा… खूप खोलवर परिणाम तिच्या पुढच्या जीवनावर झाला.
या सगळ्याची परिणिती भावाच्या सांगण्यावरून लग्न झाल्यावर तिच्याशी म्हणजे ऊर्मिलाशी कुठलाही संपर्क ठेऊ नका..आणि त्या अजाण ऊर्मिलाच्या काळजात हा घाव खोलवर रूतला…
नवीन परिसरात आलेल्या मुलीला माहेरचे हरप्रकारे जपतात पण ऊर्मिलाच्या माहेरच्यांनी तर दारे बंद करून घेतली..आज विचार स्वतःशीच ऊर्मिला करते,तेव्हा लक्षात येतं सर्वांची अशी वागणूक प्रॉपर्टीच्या मुद्द्यावरून झाली होती..
तर अशा प्रकारे ऊर्मिलाच्या डोळ्यापुढे माहेरची न दिसणारी वाट होती…..
भक्ती केंजळे
सोमेश्वर















