prabodhini news logo
Home कोरची शासकीय आश्रमशाळा कोरची येथे शालेय मंत्रीमंडळ गठीत

शासकीय आश्रमशाळा कोरची येथे शालेय मंत्रीमंडळ गठीत

0
356

कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – कोरची : तालुक्यातील कोरची येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आ श्रम शाळेत नुकतीच शैक्षणिक सत्र २०२५-२६ करीता शालेय निवडणूक पार पडलेली. शालेय निवडणूक ही विद्यार्थ्यांच्या लोकशाही संस्कारांचा एक सुंदर अविष्कार ठरली. या निवडणुकीत कु. भुमिका सुनील मडावी हिला बहुमताने शालेय मुख्यमंत्री तर मनिष क्रीष्णा ऊईके याला शालेय उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी आपले ११ सदस्यांचे मंत्रिमंडळ स्थापन करून शाळेचा कारभार हाती घेतला आहे. शाळेतील लोकशाही संस्कारांचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि संघभावना रुजवणारा ठरत आहे.असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. सर्व नियुक्त मंत्र्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हिरालाल ऊईके, शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक तथा शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.
निष्ठेने काम करण्याची शपथ शालेय मंत्रिमंडळाचा सामूहिक शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. निवडलेल्या मंत्र्यांना निष्ठेने काम करण्याची तसेच पद आणि प्रतिष्ठेची शपथ डाकराम ठाकरे यांनी दिला. शपथ विधीनंतर लगेच खाते वाटप करण्यात आले. यात वसतिगृह प्रमुख विजय तुकाराम नैताम व अमित्रा झाडुराम कांटेंगे, आरोग्य प्रमुख सुजल तुमरेटी व कु.माहेश्वरी हारमे , स्वच्छता प्रमुख अर्जुन कोरचा व कु. दिक्षा कोरेटी, पर्यावरण व वृक्षारोपण प्रमुख कु रसिका मडावी व संदिप कोल्हे, भोजन व पाणी प्रमुख राकेश हिडामी, क्रीडाप्रमुख जीवन कोरेटी व रेषमा कुंजाम, आणि सांस्कृतिकप्रमुख पायल जाडे व खुशांत कुमरे, व्यसनमुक्तीप्रमुख उमेश हिडामी व विद्या दर्रो या याशिवाय अभ्यास, पुस्तक, परिपाठ, शिस्त आणि उपस्थिती या शालेय विषयांच्या खात्याचा समावेश आहे.
ही निवडणूक लोकशाही पद्धतीने घेण्यात आली. या निवडणुक रिंगणात इयत्ता ५ ते १२ वी चे विद्यार्थी उभे होते. उमेदवारी अर्ज मागवणे, छाणनी, वर्गवार प्रचार, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी, निकाल जाहीर करणे, खातेवाटप, शपथविधी आदी प्रक्रियांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
या संपूर्ण प्रक्रीयेचा कारभार राज्यशास्त्राचे प्रमुख प्रा.अरुण कांयदे,प्रा.राहुल अंधारे, प्रा.प्रमोद शंभरकर, भैयालाल कुरसंगे, संतोष सहारे, अमित मेश्राम यांनी पाहिले.. मुल्यांकनाचे काम गीता राऊत, सुषमा आंबोणे छाया पटले यांनी केले..वार्तांकन हरीश कामडी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here