prabodhini news logo
Home अमरावती प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजची कविता – न दिसणारी वाट

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजची कविता – न दिसणारी वाट

0
169

मानव जीवन जगतो
आशा नव्या बाळगतो
सूर्य उगवतो,रोज मावळतो
मानव फक्त धावत असतो
न दिसणारी वाट शोधतो

धन जास्त,कमी कमावतो
अपेक्षाचे पहाड चढवतो
स्वप्न वेगळे वेगळे बघतो
परिपूर्तीत फक्त लढतो
न दिसणारी वाट शोधतो

आलेख आकृतीचे रचतो
रंगधंग नवे नवे अवलंबतो
शिक्षणाची पैज जिंकतो
यशाची चाबी मिळवतो
न दिसणारी वाट शोधतो

जीवनरुपी वाटेला वळणं देतो
नातेगोत्याचे वलय विणतो
गोल,गोल,चक्रात गुंततो
जबाबदारीचे गणित सोडवितो
न दिसणारी वाट शोधतो

प्रा.सिम्रेला देशमुख
अमरावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here