
आ.विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व मान्य
प्रवेशितांमध्ये जाणीवार्ड, हळदा, मुडझा, कुडेसावली,नांदगाव, सुरबोडी, पारडगाव येथील कार्यकर्त्यांचा समावेश
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपुरी तालुक्यात विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या विकासाचा झंजावात व काँग्रेस पक्षाच्या विचार सरणीला प्रेरित होऊन.
जाणीवार्ड, हळदा, मुडझा, पारडगाव, कुडेसावली, नांदगाव, सुरबोडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य राजकीय पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाला रामराम ठोकत विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचे उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षासह अन्य राजकीय पक्षांना ब्रम्हपूरीत मोठी खिंडार पडली आहे.
गेल्या १० वर्षापासून विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी क्षेत्र विकासासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून कोट्यावधींचा विकास निधी खेचून आणला. तद्वतच संपुर्ण क्षेत्रांतील सर्व समाजाला समान न्याय, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, अनेक सामजिक कार्य यासह अत्यावश्यक मूलभूत गरजा पुर्ण करुन नागरिकांच्या अडचणी दूर केल्या.अशा विविध कार्यांना प्रेरित होऊन ब्रम्हपुरी तालुक्यासह शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
सदर पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वासु सोंदरकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पराग बनपुरकर, कृउबा संचालक केशव भुते यांच्या नेतृत्वाखाली पार पडला आहे.
यावेळी पारडगाव उपसरपंच सुधीर पिलारे, कुडेसावली उपसरपंच कोमल टेंभुर्णे, मुस्ताक कुरेशी, हिवराज पाऱधी, हरीदास ठेंगरी, बंडु पाल, रतन सोंदरकर, अतुल तोडासे, शेखर करानकर, अनिकेत देशमुख, पवन सोनवाने, ओमप्रकाश खुळशिंगे, संजय नाकतोडे, सुनिल बगमारे, अमित प्रधान, अश्विन सहारे, गौरव सहारे, श्रवण धोटे, वैभव बगमारे, गणेश खरकाटे, आशिष प्रधान, यादव प्रधान, किशोर प्रधान, खुशाल प्रधान, राहुल दुपारे, अवि राऊत, वैभव भावडकर, भावेश तलमले, नारायण भानारकर, मनिष पगाडे, यश तलमले, बबलू श्रिवास्तव, प्रभाकर पाल, अनुराग मिसार, तेजस वाघाडे,लिलाधर कोटगले, धनराज नन्नावरे, प्रविण टेंभुर्णे, भक्तदास हुलके, देविदास उंदीरवाडे, वैभव भोयर, भवन वंजारी, चेतन तुपट यांसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
आयोजित पक्ष प्रवेशाप्रसंगी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी नगरसेवक डॉ नितीन उराडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, माजी न.प.उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, कृउबा संचालक प्रशांत उराडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, निनाद गडे, अॅड.आशिष गोंडाणे, तालुका उपाध्यक्ष अतुल राऊत, अनुसूचित जाती शहराध्यक्ष मुन्ना रामटेके, न.प.फुटपाथ असोसिएशनचे रविंद्र पवार, प्रिन्स नंदुरकर, मोहन मिसार व बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काॅग्रेस पक्षाचाच झेंडा फडकणार हे निश्चित मानले जात आहे.















