prabodhini news logo
Home चंद्रपूर आजाद समाज पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी रमेश चापले यांची नियुक्ती

आजाद समाज पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी रमेश चापले यांची नियुक्ती

0
197

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – आज दिनांक – 3 आगष्ट 2025 रोज रविवारला आजाद समाज पार्टी कांशीराम जिल्हा चंद्रपूर चा वतीने मिटिंग आयोजित करण्यात आली होती.
या मिटिंग ला प्रमुखांनी महाराष्ट्र व विदर्भ पुर्व चे पदाधिकारी सन्माननीय रूपचंद टोपले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय डॉ .जे.बी. रामटेके महाराष्ट्र प्रदेश महासचिव, सन्माननीय दिगंबर पलटनकर महाराष्ट्र प्रदेश सचिव, सन्माननीय नितीन नागदेव विदर्भ पुर्व अध्यक्ष सन्माननीय सुरेश मल्हारी पाईकराव विदर्भ सचिव यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी रमेश चापले यांना आजाद समाज पार्टीचा दुप्पटा व पुष्पगुच्छ देऊन यांची नियुक्ती करण्यात आली.
OBC बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. रमेश चापले हे MA B EAD झालेले असुन त्यांना राजकारणातील अनुभवी व्यक्ती महत्त्व सुद्धा आहेत. आजाद समाज पार्टीचा चंद्रपूर येथे पाया रोवण्यासाठी व बहुजन समाजातील घटकातील लोकांवरती होणार्‍या अन्याय विरुद्धात आवाज उचलुन त्यांना शासन दरबारी मांडुण न्याय देण्याचा प्रयत्न करणार असे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांनी यावेळेस सांगितले.

कार्यक्रमाची सुत्रसंचालन चंद्रपूर जिल्हाचा महासचिव रिता देशकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संकेत आवळे यांनी केले
सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रमेश चापले यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here