
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क – गडचिरोली – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांचा गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने भव्य सत्कार सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शहरातून काढण्यात आलेली उत्साही मिरवणूक.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे होते. त्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करताना युवकांशी संवाद साधला. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले, “देशाची खरी ताकद युवा वर्गात आहे. सध्याच्या काळात लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी युवकांनी सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे.”

या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान, माजी खासदार मारोतरावजी कोवासे, आरमोरीचे आमदार रामदास मसराम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, महिला जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, प्रकाश इटनकर, भातकुलवार साहेब, युवक काँग्रेसचे महासचिव अतुल मल्लेलवार, प्रदेश सचिव प्रतीक बारसिंगे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे व इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची संपूर्ण शान आणि उत्साह युवकांच्या सहभागामुळे अधिकच वाढली असून, नवीन नेतृत्वाच्या स्वागतात जिल्ह्याने एकत्र येऊन ऐक्याचे दर्शन घडवले.















