prabodhini news logo
Home महाराष्ट्र प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – न दिसणारी वाट

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – न दिसणारी वाट

0
179

जीवन जगत असतांना अनेकांकडून अपभ्रंश शब्द प्रयोग केला जातो.कोणीही साहजिकच जाणूनबुजून बरेवाईट बोलण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळेच आपली उमेद,उत्साहात अगतिकता येत असते.तरी कोणी विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांशी निरुत्तर व्हावे.याचाच अर्थ असा की आपली अवहेलना करतो हे जेव्हा आपणांस लक्षात येते. तेव्हा मात्र समजून घेणं गरजेचं असते.कारण आपण कुठेतरी कमी पडतो.हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे असते. एकतर बोलण्यात,वागण्यात,ऐकण्यात हे असमजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे परिस्थिती जरी कशीही असेल तर हव्यास मात्र नवीन घटक अथवा गोष्टी शिकण्याची तयारी असली पाहिजे.असा मनाशी निश्चय करणे शक्य आहे.मनातून गैरसमज नावाची संकल्पना हद्दपार करावी.
म्हणजेच आपण करीत असलेलं दुर्लक्ष हेच जणू जीवनातील अशुद्ध कृती आहे हे जाणणे किंवा तत्क्षणी लक्षात येणं समंजस पद्धतीने समजून घेणे आवश्यक असते.त्यामुळेच नवीन संधी,नवीन मार्ग यांचा शोध घेणे ही समज निश्चितच येते.त्यामुळे संघर्षाची वृत्ती असावी. तेव्हाच जीवनात प्रगल्भ विचारांच्या माध्यमातून यशाचा मार्ग मोकळा होतो.आपली आर्थिक स्थिती तितकीशी योग्य नसतांनाही समर्थपणे त्या समस्येवर मात करता आली तरच आपण जीवनाच्या वाटेवर यशस्वी होऊ शकतो.त्यासाठी मनाचा आत्मविश्वासही तितकाच आवश्यक आहे.म्हणूनच’लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले,पावले चालो पुढे,जो थांबला तो संपला.’ अशी स्थिती निर्माण होते.म्हणून जीवनात कितीही कठीण प्रसंग आलेत तरीही आत्मविश्वासाने लढवय्या वृत्तीने झुंज देणे.तरच आपणांस सुखाच्या अनुभवांची फळे निश्चितच चाखायला मिळतील.
याचाच अर्थ असा की आपण आपला प्रयत्न,ध्यास आणि उचित ध्येय गाठण्यासाठी केलेले अथक परिश्रम! हे निश्चितच आपणांस सुखद अनुभवाची जाणीव करून देत असतात. त्यासाठी मनाची स्थिती लक्षात घेता, जिद्दीन, निकराने आणि।कटाक्षाने सामोरे गेले तर यश निश्चितच मिळते.त्यामुळे लक्ष प्राप्तीसाठी मनाचा संकल्प तितकाच महत्वपूर्ण असतो.त्याने आयुष्यातील न दिसणारी वाट सापडली की आपलं जीवनमान खरोखरच उंचावेल यात अजिबातच शंका नाही.यासाठी स्थित मनाचा आत्मविश्वास दृढ करणं योग्यच ठरणार.संकल्प सिद्धीसाठी मनोकामना,इच्छा,मनोबल,कष्ट आणि आत्मविश्वास तितकाच दांडगा असला पाहिजे.त्यामुळेच न दिसणारी वाटही अनुभवता येते. तेव्हा मात्र खरोखरच यशाचं शिखर गाठू शकतो.इतका आत्मविश्वास खरंच निश्चितच वाढतो.काम करण्याचे सामर्थ्य आणि धाडस निर्माण होते.
जीवन जगत असतांना कितीही संकटे आलीत तरीही त्यांशी संघर्ष करणं.त्यातूनच नवीन जगण्याची उमेद प्राप्त होते.जीवनाला नवीन दिशा मिळाली की जगण्याचा मार्ग सुखकर होतो.मनोबल ढासळता कामा नये.मनात तीव्र इच्छा अंगिकारली की निश्चितपणे यश पदरात आपोआपच येत असते.खडतर परिस्थिती आपणास त्याग शिकवून जाते.म्हणूनच सामाजिक ऐक्य टिकविण्यात प्रयत्नशील असणे.आपल्यातील उणीव अथवा कमतरतेमुळे काय काय समस्या निर्माण होतात. याचं भान ठेवून कोणतीही योग्य कृती करणे आवश्यक असते.जीवनाचा गाढा हा अथक प्रयत्नात सिद्ध करता येऊ शकते.याची सुनिश्चिती येऊ शकते.म्हणून मार्ग क्रमण करीत असतांना जीवनात बरेच कटू अनुभव येत असतात.आणि होय,त्याच अनुभवांची शिदोरी घेऊन ध्येय प्राप्तीसाठी अडचणीच्या वाटेवरून नवीन न दिसणारी वाट मिळाली की,जीवनात यशस्वी होऊ शकतो.याची जणू प्रचिती येते.
वृत्ती निस्वार्थी असणे तितकेच महत्वाचे असते. त्यामुळे ध्येय गाठण्यासाठी अधिकत्तम प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत नाही.सदमार्ग आणि सद्सद्विवेक असणे गरजेचे आहे.ज्या जीवनाच्या वाटेवर अपयश पत्करले असते.त्यातूनच अदृष्य अशी वाट सापडते.तीच आपणांस नवं ऊर्जा आणि नवं चैतन्य निर्माण करून देते.त्यामुळेच अपयशाची पहिली पायरी असली तरीही यश फारसे दूर नसते.कारण न दिसणारी वाटेचा परिचय होतो.त्यातून सत्याचा शोध घेता येऊ शकतो.परिणामी परिणामही सकारात्मक होत असतात. फक्त विचारांची प्रगल्भता वाढवावी.विचारांनीच जीवनात सुगंध प्राप्त होत असतो.यात अजिबात शंका नाही. कारण विचार बदलला की स्वभाव बदलत असतो. स्वभावात दुसऱ्याविषयी आपलेपणाचा भाव निर्माण होतो.म्हणजेच सवयी बदलतात.तसेच बदललेल्या सवयींतून व्यक्तिमत्त्व सुधारत असते.आणि होय, व्यक्तिमत्त्व सुधारले तर भवितव्य नवीन वळणार निश्चितच थांबते.त्यामुळे जीवन समृद्ध होते.त्यामुळे विचारातून स्व परिवर्तन घडवून आणणे उचित ठरते. कारण जीवन मार्गच आपला खरा मार्गदर्शक ठरतो. त्यानेच जीवनाला गती मिळत असते. याचं भान असणे गरजेचे असते. म्हणून खचून न जाता नव्या जोमाने आणि उमेदीने संघर्ष करावाच हीच अपेक्षा अपेक्षित आहे.

शब्दांकन पुष्पमाला
श्री. शिवाजी किसन माळी.(मुंबई)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here