
देसाईगंज प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले दहावे राष्ट्रीय अधिवेशन गोवा येथे पार पडत असून, या अधिवेशनात सहभाग घेण्यासाठी ओबीसी समाज संघटना तालुका देसाईगंज येथील सर्व कार्यकर्ते रवाना झाले.
या प्रसंगी ओबीसी समाज संघटना तालुका देसाईगंजचे अध्यक्ष लोकमान्य बर्डे यांच्या हस्ते व चक्रधर पारधी, राजेंद्र बुल्ले, विलास ठाकरे, ज्ञानेश्वर कवासे, महेश पिलारे,नितीन राऊत गजाननजी सेलोटे, अरुण कुंभलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून कार्यकर्त्यांच्या संचाला शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर अधिवेशनात ओबीसी समाजाच्या हक्क, अधिकार, राजकीय सहभाग, आरक्षण आणि संघटनात्मक मजबुती या मुद्द्यांवर विचारमंथन होणार असून, देसाईगंज तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी सहभागी होत असल्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
कार्यकर्त्यांच्या या उपस्थितीतून ओबीसी समाज संघटनेची संघटनात्मक ताकद व एकजूट अधोरेखित होत आहे, असे मत यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.















