prabodhini news logo
Home चंद्रपूर विधीमंडळ गटनेते आ.विजय वडेट्टीवारांनी केली रणमोचन येथील नागरिकांना डोंगा खरेदीसाठी आर्थिक मदत

विधीमंडळ गटनेते आ.विजय वडेट्टीवारांनी केली रणमोचन येथील नागरिकांना डोंगा खरेदीसाठी आर्थिक मदत

0
336

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपूरी तालुक्यातील रणमोचन या गावातील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती ही बोळेगाव शेतशिवारात आहे. बोळेगाव शेतशिवारात जाण्यासाठी भुतीनाला ओलांडावा लागतो. भुतीनाल्याला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी राहत असल्याने डोंग्याने प्रवास करून शेतकरी आपल्या शेतात जातात. मात्र यावर्षी आलेल्या पुराने डोंगा पुरात वाहून गेला. त्यामुळे आता डोंगा उपलब्ध नसल्याने रणमोचन येथील शेतकऱ्यांसमोर शेतात कसे जायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

रणमोचन येथील ग्राम काॅंग्रेस कमीटीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना सदर बाब निदर्शनास आणून दिली असतात त्यांनी शेतकऱ्यांपुढे असलेली समस्या लगेच मिटावी म्हणून डोंगा खरेदीसाठी आपल्या स्वतःकडुन ५० हजार रुपयांची रोख रक्कम रणमोचन येथील नागरिकांना दिली.

यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, रणमोचन येथील ग्राम काॅंग्रेस कमीटीचे अध्यक्ष संजय प्रधान, निलकंठ शंभरकर, मोरेश्वर गुरनूले, तालुका सरचिटणीस विलास मेश्राम, संदीप कुथे, प्रदीप भुरके, ब्रम्हा दोनाडकर, प्रकाश कुथे, विकास मेश्राम, केशव राऊत यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here