prabodhini news logo
Home ठळक बातम्या लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी १०७ सिक्युरिटी...

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी १०७ सिक्युरिटी गार्ड यांना तात्काळ कामावर घ्या

0
135

अन्यथा भीम आर्मीच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल

असा इशारा माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी दिला

लक्ष्मण कांबळे लातूर प्रतिनिधी – २०१३ पासून १०७ लोक सिक्युरिटी गार्डच्या माध्यमातून लातूर येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी काम करत होते कोरोनाच्या काळामध्ये या लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे कोरोना झालेल्या रुग्णांना त्यांचे नातेवाईक जवळ करत नव्हते तेव्हा हेच सेक्युरिटी गार्ड रुग्णांना मदत करण्याचे काम करत होते कोरोना झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास आपल्या जीवाची परवा न करता मृत रुग्णांना उचलण्याचे कामही या सिक्युरिटी गार्डन केले होते सतत बारा वर्ष रुग्णसेवा करणाऱ्या सेक्युरिटी गार्ड यांना कोणतीही नोटीस न देता ३१ जुलै रोजी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक यांनी उद्यापासून कामावर येऊ नये असे पत्र काढले आहे त्यामुळे १०७ परिवारावरती उपासमारीची वेळ आलेली आहे १०७लोकांना डावलून महाराष्ट्र सुरक्षा बल चे जवान त्या ठिकाणी नियुक्त केले जाणार आहे महाराष्ट्र सुरक्षा बल च्या जवानांना २५ ते ३० हजार रुपये महिना पगार असून हे १०७ सिक्युरिटी गार्ड ९००० पेमेंट वरती काम करत असताना जास्त पगार देऊन महाराष्ट्र सुरक्षा बल जवानांना बोलवण्याची काय गरज होती वाया जाणारा पैसा लोकांच्या कष्टाचा आहे हा पैसा व्यर्थ जाऊ नये तसेच १०७ लोकांना पूर्ववत कामावरती घेण्यात यावे अन्यथा भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचे अधीक्षक यांना माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी दिला यावेळी १०७ सेक्युरिटी गार्ड उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here