
दिंडोरी प्रतिनिधी संदीप अवधूत सह अमोल भालेराव – दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील वारकरी सांप्रदायाचे अशोक हरिभाऊ पवार यांची नुकतीच दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हमाल मापारी संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
दिंडोरी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक सभापती प्रशांत कड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.यावेळी सर्वानुमते अशोक पवार यांची हमाल व्यापारी संचालकपदी निवड करण्यात आली.अशोक पवार हे अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.यावेळी पवार यांचा माजी आमदार रामदास चारोस्कर सभापती प्रशांत कड व उपसभापती योगेश बर्डे कैलास मवाळ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बाजार समितीचे संचालक कैलास मवाळ,नरेंद्र जाधव,गंगाधर निखाडे पांडुरंग गडकरी,बाळासाहेब पाटील,दत्तू भेरे दत्ता शिंगाडे,दत्ता राऊत,अर्चना अपसुंदे,विमल जाधव,प्रवीण जाधव,शाम बोडके,नंदलाल चोपडा,अमित चोरडिया,सुधाकर जाधव,सचिव जगन्नाथ जाधव आधी उपस्थित होते.















