prabodhini news logo
Home ठळक बातम्या खराब रस्त्यामुळे वणी देवीमंदिर ते आदिवासीं मुलींचे वसतिगृह पर्यंत गाडी चालवितांना वाहनचालकांची...

खराब रस्त्यामुळे वणी देवीमंदिर ते आदिवासीं मुलींचे वसतिगृह पर्यंत गाडी चालवितांना वाहनचालकांची दमछाक प्रशासनाची हाताची घडी तोंडावर बोट….

0
152

वणी प्रतिनिधी अमोल भालेराव सह संदीप अवधूत – के आर टी हायस्कूल समोरील रस्ता बनला खाचखळगे व घसरगुंडीचा बनला.दर्जेदार व गावात प्रवेश करणारे रस्ते हे चकाचक व सुस्थितीत असावे.ही वाहन कर भरणार्या सर्वसामान्य नागरीकांची छोटीशी व माफक अपेक्षा,मात्र रस्त्याची दुरावस्था झाली तर वाहने चालविणे तसेच पायी चालणेही अवघड होते.वणी मंदीर ते हॉस्टेल येथील रस्त्यावर पावसात चिखलाचे साम्राज्य असते झाले आहे.प्रारंभीपासुनच प्रकाशझोतात व चर्चेत असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत ,दर्जा व गुणावत्तेबाबत नागरिकांमधे नाराजीचा सुर होता.या ठिकाणी ग्रामपालीकेची जुनी इमारत आहे.तसेच या भागामधे नागरी वस्ती मोठया प्रमाणात आहे.तसेच कळवण मुळाने बारितून वणीत प्रवेश करण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे.त्यामुळे या रस्त्याचा वापर वाढलेला आहे.वाहनांची वर्दळही वाढलेली आहे.मात्र मागील पावसाताच या रस्त्याचे वास्तविक स्वरुप उघङ झाले होते.रस्त्यावर चिखल साचल्याने हा रस्ता निसरडा बनला होता.दुचाकी व चारचाकी वाहने घसरुन अपघात झालेले आहेत व भविष्यात अपघात होण्याची शक्यता नागरीकांनी वर्तविली आहे.ग्रामविकास अधिकारी यांनी संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून योग्य ती कार्यवाही करुन विद्यार्थी व वाहनचालकांचा त्रास टाळुन दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here