prabodhini news logo
Home ठळक बातम्या दिंडोरी तालुक्यातील २३ गावांचा पाणलोट विकास योजनेत नव्याने समावेश

दिंडोरी तालुक्यातील २३ गावांचा पाणलोट विकास योजनेत नव्याने समावेश

0
121

दिंडोरी प्रतिनिधी संदीप अवधूत सह अमोल भालेराव – परनॉर्ड रिकार्ड इंडिया व वॉटरशेड ऑर्गेनाइजेझन ट्रस्टच्यावतीने
दिंडोरी तालूक्यातील २३ गावांचा पाणलोट विकास योजनेत नव्याने समावेश करण्यात आला असून पंचायत समिती येथे कार्यशाळा पार पडली.
पाणलोट विकासाच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नव्याने समावेशीत गावात उपक्रमाची सुरुवात करण्याच्या दृष्टीने,प्राथमिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.पाणलोट विकास योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार असून, जलस्तर सुधारण्यास मदत होईल. यामधून शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणण्याचा उद्देश आहे
या मेळाव्यात प्रकल्प व्यवस्थापक निलेश बागुल यांनी ग्रामस्थांना पाणलोट विकासाची संकल्पना,त्याचे फायदे,अंमलबजावणीची प्रक्रिया आणि सहभागाचे महत्व स्पष्ट केले. यावेळी गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी विविध उपाययोजना,जसे की जलसंधारण,मृदसंधारण, वृक्षारोपण बाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रम प्रसंगी परनॉर्ड रिकार्ड इंडिया फाउंडेशनच्या सी.एस.आर अधिकारी अंनतिका,वॉटर संस्थेची टीम,सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक, कृषी विभाग,वन विभाग आदीसह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here