prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – हे बंध रेशमाचे

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – हे बंध रेशमाचे

0
137

भाऊ बहिणीच्या स्नेहानी
उजळले दिशा आनंदाने
हे बंध रेशीमाने सजले
रक्षाबंधनाच्या निमित्ताने

रूढीपरंपरेचाच हा सण
येतात एकत्र भाऊ-बहीण
वाहतो झरा वास्तल्याचा
राजा महाराजांच्या काळापासून

घट्ट असतात बंध सुंदर
बहिण भावांच्या विश्वासानी
भाव अंतरीचे जाणतात
प्रकृतीचीच अशी ही करणी

थट्टा, मस्ती, भांडण
ही असते यांची शस्त्र
जरी होई कुणाला काही
बेचैन होतात आणि त्रस्त

असेल जोपर्यंत जगाचा
भावा बहिणींची प्रीत
सुंदर निसर्गाची रेषा
या रेशीम बंधाची जीत

रंजना भैसारे, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here