
पारंब्या आठवणींच्या
सळसळ करीती मनात
हसू उमटते मुखावर
बसता जीवन पारावर ||१||
आठवतो मज गावातील
तो चौसोपी सुरेख वाडा
सजलेले देवघर म्हणजे
प्राजक्त फुलांचा सडा.||२||
ओसरीवर घुमती
परवाच्याचे सूर
आजोबांच्या अभंगाचा
आगळाच नूर. ||३||
मजेत बालपण सरले
अभ्यासात तरुणपण हरवले
स्वप्नमागे धावण्याच्या युगात
कित्येक आनंदक्षण गमावले.||४||
धनसंपदा कमावली,
मन:शांती गमावली
मोहमयी या दुनियेत
बाह्यसुखाला मने आसुसली ||५||
शहरात आता कुठला वड
कुठे दिसणार पारंब्या?
परी पारंब्याच्या आठवात
मन माझे झुलणार
मन माझे झुलणार.||६||
सौ. अंजली गरगटे
पुणे














