
सण हा सोख्याचा,आनंदाचा
दिवस आज रक्षाबंधनाचा
सुंदर राखी बांधली मनगटावर
माया अशीच राहू दे जन्मभर
बंधन आहे अजून जरी
काळ बदलला, नाती बदलली
फक्त माझा मी, माझी मी
ही रीत जगाची झाली
माणसाला जगण्यासाठी
पैसाच हवा वाटतो
बाकी सारे नगण्य
या भ्रमात माणूस फसतो
जवळ असता आपली माणसे
जीवनाला अर्थ प्राप्त होतो
भावनाशून्य जगणे, जगणे नसते
व्यवहाराचा सापळा असतो
सण उत्सव असतात
जीवनातले आनंदाचे झरे
कुपीत काळजाच्या जपुन ठेवावे
आयुष्यातील मोल्यवान हिरे
गुलाब अनिल वेर्णेकर, गोवा















