prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन 

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन 

0
123

आली श्रावणी पौर्णिमा
धागा राखीचा घेऊन
सांगतसे बंधूसया
रक्षाबंधनाचा सण ।।1।।

बंधू प्रेमाचे प्रतीक
धागा राखीचा हसतो
ताई दादाच्या प्रेमात
स्वार्थ मुळीच नसतो ।।2।।

सण रक्षाबंधनाचा
मना माझ्या मोहवितो
वाट पाहते दादाची
पल आनंदून जातो ।।3।।

प्रेम भाव औक्षणाने
तुझं लाभो सारे सुख
हेच मागणे देवाशी
पित्या जागी तुझे रूप ।।4।।

नको दादा ओवाळणी
सारे सुख माझ्या दारी
तूच पाठीराखा माझा
फिकी दौलत रे सारी ।।5।।

जग बदलले सारे
माया प्रेम दुरावले
नको हरवू तू त्यात
मन माझे साशंकले।।6।।

माझ्या रक्षणाच्यासाठी
उभा पाठी राहतोस
बहिणीच्या सुखासाठी
सारे दुःख साहतोस ।।7।।

आई-बाबा देवरूप
सेवा त्यांची कर नित्य
हेच मागणे रे तुज
नको विसरूस सत्य ।।8।।

सौ. यादव उज्ज्वला राजेंद्र
भेकराईनगर,हडपसर, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here