prabodhini news logo
Home कोपरगाव श्री क्षेत्र चास नळी येथील हनुमान मंदिर व जगद्गुरु संत तुकाराम महाराज...

श्री क्षेत्र चास नळी येथील हनुमान मंदिर व जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.

0
171

कोपरगाव प्रतिनिधी
नवनाथ उल्हारे

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील हनुमान मंदिरात तुकाराम बाबा खेडलेकर व काशिनाथ महाराज खराटे यांच्या कृपाशीर्वादाने हभप रघुनाथ महाराज खेडलेकर यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते हा सप्ताह दिनांक 6_8_2025 रोजी सुरू करण्यात आला. या सप्ताह सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रथम चार ते सहा काकडा भजन. सकाळी सात ते अकरा श्री ज्ञानेश्वरी पारायण वाचन. सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व सायंकाळी सात ते नऊ हरिकीर्तन व त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम अशी रूपरेषा अखंड हरिनाम सप्ताह करण्यात आली होती. व बुधवार दिनांक 13 8 2025 रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत वारकरी रत्न गुरुवर्य ह भ प श्री ज्ञानेश्वर माऊली शिंदे (ज्ञानसाधना आश्रम रुई तालुका निफाड )यांचे जाहीर हरिकीर्तन झाले. व दहीहंडी फोडून भोजनाचा कार्यक्रम झाला. प्रथम गावातून ग्रंथ पारायण व गोदावरी नदी पाण्याचे मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत समस्त ग्रामस्थ महिला मंडळ व भजनी मंडळ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ही फक्त एका कार्यक्रमाची समाप्ती नसून ती आपल्या गावच्या भक्तीभाव ऐक्य आणि प्रेमाचे जिवंत साक्ष आहे. गेल सात दिवसांत हरिनामाचा गजर कीर्तनातील ज्ञान अमृत आणि पंक्तीतील प्रेम या सर्वांनी आपल्या हृदयात भक्तीचा दिवा पेटवला. या पवित्र कार्यासाठी ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वाद तरुण वर्गाची निस्वार्थ सेवा मातृ शक्तीचे प्रेमळ हात आणि लहानग्यांचा निरागस उत्साह या साऱ्यांनी हा सोहळा अविस्मरणीय केला. या सप्ताह दरम्यान 6 तारखेची किर्तन सेवा ह भ प बाबुराव महाराज (चास नळी)7-तारखेची किर्तन सेवा रामायणाचार्य हभप नंदकिशोर महाराज खरात नेवासा.8-तारखेची कीर्तन सेवा समाज प्रबोधनकार संग्राम बापू महाराज भंडारे आळंदी.
9-तारखेची कीर्तन सेवा शिवशाहीर शरद महाराज ढवळे संगमनेर.10-तारखेची कीर्तन सेवा रघुनाथ महाराज खेडेलेकर.11-तारखेची कीर्तन सेवा शिवाजी महाराज वटंबे आळंदी.12-तारखेची कीर्तन सेवा भागवताचार्य दत्ता महाराज झाडे परभणी.13-तारखेची कीर्तन सेवा ज्ञानेश्वर माऊली शिंदे रुई यांचे जाहीर हरिकीर्तन होऊन महाप्रसाद व भोजनाचा कार्यक्रम होऊन या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here