
प्रणाली येरपुडे विशेष तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – भिम आर्मी संस्थापक अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंग, महाराष्ट्र प्रभारी भाई अनिल ढेनवाल यांच्या कार्याला प्रेरित होऊन अनेक युवक, युवती, महिला यांचा भिम आर्मीत प्रवेश करण्यात आले..
स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून भिम आर्मीच्या फलकाचे भिवापूर प्रबुद्ध नगर इथे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रायपुरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
सदर अनावरण सोहळ्यात चंद्रपूर जिल्हा संघटक विशाखा आमटे, तालुका प्रमुख हिमांशू आवळे, प्रबुद्ध नगर शाखा प्रमुख राकेश आवळे, सचिव नितीन मुन, उपप्रमुख अनिरुद्ध ब्राम्हणे, जिल्हा सदस्य भीमराव आमटे, शहर उपप्रमुख धम्माभाऊ उराडे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.















