
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर (तुकुम) : एस.टी. वर्कशॉप चौक, तुकुम, चंद्रपूर येथे शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजता स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्टीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण सुभाष कासनगोटटुवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सुबोध कासुरकर यांनी केले, तर कार्यक्रमाची पूर्वतयारी नरेश वानखेडे, राजेश दहाडे आणि देवेंद्र बोकाडे यांनी केली.
आध्यात्मिक विश्व विद्यालय, चंद्रपूर तर्फे वर्षा मदनकर यांनी “तिरंगा आध्यात्मिक अर्थ” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी ध्वजातील तिन रंगांचा आध्यात्मिक अर्थ स्पष्ट केला —
* हिरवा रंग : ब्रम्हा द्वारे स्थापना
* पांढरा रंग : विष्णु द्वारे पवित्रता व पालन
* केसरी रंग : शंकर द्वारे क्रांती, ऊर्जा व तिसऱ्या नेत्राचे प्रतीक
त्यांनी सांगितले की आत्मज्ञानाद्वारे माणूस आपल्या विकारांवर विजय प्राप्त करून स्व:ताला नियंत्रित ठेवतो आणि तोच खरा स्वतंत्र मानला जातो.
कार्यक्रमाची सांगता पतंजली कार्यकर्त्या अरुणा मुरलीधर शिरभय्ये यांनी सामूहिक “वंदेमातरम्” गीत गाऊन केली.
या ध्वजारोहण कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली.












