
भंडारा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त गांधी विद्यालय, पहेला येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन उत्साहात पार पडले. स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली – गट अ (इयत्ता ५ ते ७), गट ब (इयत्ता ८ ते १०) आणि गट क (इयत्ता ११ व १२).
गट अ मध्ये कु. नेहा ज्ञानेश्वर नखाते (इ. ७ वी) हिने प्रथम क्रमांक, तर कु. गुडिया सुकराम मारबते (इ. ५ वी) हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
गट ब मध्ये कु. समीक्षा अरविंद कावळे हिने प्रथम, कु. साहिल नत्थु पडोळे याने द्वितीय आणि कु. उत्कर्षा प्रकाश शेंडे हिने तृतीय क्रमांक मिळवला.
गट क मध्ये कु. न्याहारीका गोपीचंद धुळसे हिने प्रथम, कु. हेमल विजय सार्वे हिने द्वितीय, तर कु. गुंजन चाचेरे हिने तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच विद्यालयात ‘तिरंगा राखी मेकिंग’ स्पर्धा घेण्यात आली असून, या स्पर्धेतील विजेत्यांना आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना १५ ऑगस्टच्या शुभमुहूर्तावर बक्षीस वितरण स्वातंत्र दिन सोहळा या कार्यक्रमाध्यक्ष मा.सुदाम खंडाईत तसेच ध्वजारोहण ज्यांच्या हस्ते पार पडलं त्या सन्मानिय संजीवनी जिभकाटे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.हजारे साहेब विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.योगेंद्र काटेखाये तसेच पारितोषिक वितरण करून विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या स्पर्धांचे नियोजन व परीक्षक म्हणून कार्य पुष्पा काटेखाये (कला शिक्षिका) यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. वाय. एन. काटेखाये, पर्यवेक्षक मा. व्ही. एल. हटवार तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेंच प्रा.गोंडाने, प्रा.भुरे तसेच विद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढविले.















