
आज माझी निशब्द लेखणी
अक्षर अक्षरात हसत होती
वर्धापन दिन प्रबोधिनी मंचचा
शब्दा शब्दांना सांगत होती ।।1।।
अलवार शब्द खेळत सारे
वाक्याशी हितगुज करत आले
प्रबोधिनी समूहाचे कार्य महान
मनामनात अलगद घर केले ।।2।।
अंतरीचे सहज भाव सारे
नवरसात चिंब चिंब झाले
सहाव्या वर्धापन दिनी सारे
भाव मनीचे दाटून आले ।।3।।
समाज घडणीची खरी धुरा
सांभाळते विश्वासाने प्रबोधिनी
कर्तुत्व थोर प्रबोधिनी समूहाचे
करते वंदन कार्यास मनोमनी ।।4।।
गंध दरवळला चोहीकडे
जनसामान्यांना दिले स्थान
भावनांना मुक्त व्यासपीठ
समाजसेवेचा खरा बहुमान ।।5।।
असेच बहरो कार्य आपुले
वर्धापन दिनी देते शुभेच्छा
प्रभूच्या चरणी करते वंदन
पूर्ण होवो मंचच्या इच्छा ।।6।।
सौ. यादव उज्ज्वला राजेंद्र
हडपसर, पुणे.














