prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे वर्धापन दिनानिमित्त विशेष कविता – प्रबोधिनी न्युज

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे वर्धापन दिनानिमित्त विशेष कविता – प्रबोधिनी न्युज

0
205

वर्धापनदिन आज प्रबोधिनीचा
किती मारली मजल मोठी
या मंचावरच झाल्या
कवी कवयित्रींच्या गाठीभेटी

घराघaरात आणि मनामनात
घर करून बसला मंच
वर्धापनदिनानिमित्त जमा झाला
कवितांचा हा संच

प्रशांत सरांची जिद्द
आज कामाला आली
त्यांच्यासारख्या वार्ताहराला
कळली बातमीची खोली

कष्ट त्यांनी झेलले
समाजसेवेचा घेतला वसा
म्हणूनच वर्धापनदिन साजरा होतोय
हाच खरा आरसा

सौ. सुनंदा वाळुंज ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here