prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे वर्धापन दिनानिमित्त विशेष कविता – प्रबोधिनी न्युज

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे वर्धापन दिनानिमित्त विशेष कविता – प्रबोधिनी न्युज

0
111

भाव अंतरिचे मनी
दाटले माझिया उरी
आज वर्धापन दिनी
उमटे भाव अंतरी

सारस्वतांचा सस्नेह
उमटतोच काव्यात
हास्य, प्रेम, व विश्वास
दिसे खूप समूहात

ठेवून विश्वास मनी
शब्द झरते लेखणी
आदर सारस्वतांचा
साहित्यिक गोड वाणी

चिरकाल स्मरणात
सांस्कृतिक मंच काव्य
भरभरून लेखणी
करते काव्य सुश्राव्य

वर्षानुवर्षे असाच
वाढो काव्य परीवार
काव्य लेखनाचा दिव्य
भावनांचा साक्षात्कार

सूर्याची पिवळी प्रभा
वाढे आसमंती शोभा
लेखनास माझ्या येते
झळाळी निराळी आभा

उपक्रमांनी सजते
लेखणी सारस्वतांची
हार्दिक शुभेच्छा तुम्हां
पाठी सदिच्छा आमुची

होई उचित सन्मान
सकलांच्या प्रतिभेचा
साजरा होतसे दिन
हा विशेष वर्धापनाचा

स्वरचित
नीला चित्रे
चिंचवड पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here