
चला लिहू लेख आणिकविता
पाठवू प्रबोधिनी न्यूजला
तुमच्या माझ्या साध्या सोप्या सुंदर सुंदर रचना शनिवारी रात्री अकरा पर्यंत पाठवायच्या असतात प्रबोधिनी न्यूजच्या ग्रुपला.
मग रविवारची प्रसन्न सकाळ गोड होऊन जाते. आपलेच लिखाण प्रसारित झालेल पाहून. आपल्या शब्दांचा सुगंध असा महाराष्ट्रभर पसरतो आणि आनंद देऊन जातो सर्वांना. इतरांच्या कमेंटस ऐकून पुन्हा नवा उत्साह संचारतो नव्या विषयावर लिखाण करण्यासाठी.
प्रबोधिनी न्यूज चॅनेलवर, यूट्यूब, फेसबुक वर व्हिडिओ अपलोड केले जातात.
महाराष्ट्रातील जगभरातील बातम्यांचे थेट प्रक्षेपण केले जाते.या दर्जेदार चॅनेल वर महत्वाच्या घडामोडी चे प्रक्षेपण केले जाते.
तुमच्या माझ्या शब्दांना भावनांना
जनमानसांपर्यंत पोहचविण्याचे कार्य अतिशय प्रेमाने प्रबोधिनी नेटवर्क करते.
प्रबोधिनीचे मुख्य संपादक माननीय प्रशांत रामटेके सर यांचे कार्य खूपच प्रशंसेचे आहे .
उत्तम पत्रकार आणि साहित्याची आवड असणारे प्रशांत सर सर्व सारस्वतांच्या लेख, कविता आपल्या प्रबोधिनी नेटवर्कच्या माध्यमातून प्रसिद्धीस आणतात.सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा सहभाग आहे.
गोर गरीबांना मदत करण्यात ते सदैव पुढे असतात.त्यांच्या दिलदारपणची झलक
त्यांच्या मदतीतून दिसते. प्रबोधिनी नेटवर्क हा त्यांच्या आणि त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या साऱ्यांचा कामाचा आरसा आहे.
गाव तिथे वार्ताहर या तत्वावर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा ,तालुका व ग्रामीण भागात वार्ताहर नेमल्याने चालू घडामोडी प्रबोधिनी पर्यंत येतात आणि त्या तत्परतेने प्रसिद्ध केल्या जातात.
प्रबोधिनी न्यूज ची सदैव व्हावी प्रगती
सारस्वतांच्या लेखणीची वृद्धिंगत व्हावी किर्ती .
सौ. वंदना शशिकांत पाटील
मुंबई












