prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – गौरी निघाली माहेरी

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – गौरी निघाली माहेरी

0
124

आज सोनपावलांनी
माझी गवरबाई आली
दोन दिवसांची पाहुणी
‍ साजशृंगार ही ल्याली.

तुझ्या गणरायाचा बघ
किती केला थाटमाट
तुझ्या‌साठी मांडला मी
सोनियाचा पाट.

पंचपक्वानांची बघ
तयारी सुरू केली
काजळाचं काळ तीट
लाविते तुझ्या गाली

लय देखणी तु माय
शंभु देवाची पार्वती
तुझ्या रूपाचा गोडवा
सांग मी गाऊ किती.

तुझ्या येण्याने माझे
घर आनंदुन जाते
तुझ्या पावलांनी
घरात सुखसमृद्धी येते.

सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here