
आगमन गणरायाचे होता
तनमन उत्साहित झाले
वाजत गाजत मिरवणुकीत
नाचण्यात सारे दंग झाले
ढोल ताशे लेझिम आणिक
डीजे वरती झुलती सारे
मखरामध्ये रोषणाईच्या
सजावटीत गुंगले न्यारे
अंगणात रांगोळी रेखीली
दारोदारी तोरणे लाविली
नव्या रंगात घरदार सजले
पूजेसाठी फुले पत्री आणली
गुळखोबरे फळे आणि मिठाई
गणपती बाप्पा तुझ्याचसाठी
पंचपक्वान्न केळीच्या पानावरी
सुवासिक मोदक नैवद्यासाठी
पाहुणे रावळे येती दर्शना
कंठीहार गळा घालती
पंचामृत भक्तिभावे सेविती
पंचखाद्य पेढे प्रसाद घेती
धूप आणि कापूराची आरती
तुपात भिजल्या वाती तेविती
समईचा प्रकाश मुखावरती
मोरया सारे तुझे गुणगान गाती
सौ.वंदना पाटील, मुंबई













