prabodhini news logo
Home पुणे प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष लेख – आगमन गणरायाचे

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष लेख – आगमन गणरायाचे

0
89

वक्रतुंड महाकाय,
सूर्यकोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा…

गणपती बाप्पा हे नाव ओठावर येताच, नवचैतन्य आणि मांगल्य निर्माण होते. गणेश चतुर्थी, प्रत्येक भाविक अगदी आतुरतेने या दिवसाची वाट पहात असतो.

कुठल्याही मंगल कार्याची सुरूवात करतांना गणपतीचे पूजन करून केली जाते. गणपती सर्व संकटनाशक, सुखकारक आणि विद्येची देवता आहे. सर्व संकटे हरणारा आहे, म्हणून कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी ते निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गणपतीची उपासना केली जाते. म्हणूनच गणपतीला विद्येचा अधिष्ठाता म्हटले जाते. गणपती ही सर्वांचे कल्याण करणारी, सकल जनांना आशीर्वाद देणारी देवता आहे. विघ्नहर्ता, गणपती हा बुद्धीची देवता आहे, जो प्रत्येक कार्याची सुरुवात करतो आणि सर्व अडथळे दूर करतो. तो मंगलकर्ता मानला जातो आणि त्याच्या पूजनाने घरात समृद्धी येते, असे मानले जाते.

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीस गणपतीचे वाजत गाजत आगमन होते. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषाने ढोल-ताशांच्या गजरात सुरू होतो. गणेशाला बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते, तसेच तो विघ्ने दूर करणारा ‘सुखकारक अशुभ नाशक’ म्हणून त्याची पूजा केली जाते. भक्तांच्या गर्दीने शहरांतील रस्ते फुलून जातात. ढोल-ताशांचा गजर, गुलाल, फुलांची उधळण करत बाप्पाची मूर्ती सार्वजनिक मंडळात, तसेच घरी आणली जाते. आनंदी आणि उत्साही वातावरणात सर्वजण गणपतीचे बाप्पाचे स्वागत करतात, घराघरात गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. आरती, गणपती स्त्रोत, मंत्र असे मंगलदायी वातावरण घरोघरी पाहायला मिळते. काही ठिकाणी दीड दिवस, काही ठिकाणी पाच दिवस तर काही ठिकाणी अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवस हा उत्सव साजरा करतात. बाप्पाला पंचखाद्याच्या तसेच खव्याच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. दहा दिवस सगळीकडे उत्साहाचे वातावरण पहावयास मिळते. आगमनाच्या वेळी मनामनात ओसंडुन वाहात असतो.

सौ. अंजली जोशी
चिंचवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here