prabodhini news logo
Home ठळक बातम्या श्री. नागेश्वर विद्यालय भाग शाळा, चिखली, पुणे येथे संगणक कक्षाचे उद्घाटन

श्री. नागेश्वर विद्यालय भाग शाळा, चिखली, पुणे येथे संगणक कक्षाचे उद्घाटन

0
592

पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – ऍटॉस Atos. कंपनीच्या माध्यमातून मंगळवार दिनांक : ०९ सप्टेंबर २०२५ रोजी दु. २. ००. वा. श्री. नागेश्वर विद्यालय भागशाळा चिखली पुणे येथे समारंभ संगितमय वातावरणात सुरू झाला . पाहुण्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. चव्हाण व विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. बोरचटे यांनी प्रास्ताविक केले. पाटील यांनी संगणक कक्षाची माहिती इंग्रजी स्पिच मधून सादर केली . सदर प्रसंगी प्राचार्य सानप यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्याना आजच्या काळात अधुनिक पध्दतीच्या ज्ञानाची अवश्यकता कंपनीच्या मदतीने पुर्ण करता येईल. विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा घेता येईल याचे महत्व सांगितले. कंपनीचे मा. फ्रेडरिक ऑब्रिएर अटोस ग्रुपचे मुख्य माहिती अधिकारी (CIO) यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले. रमेश रामचंद्रन, दिलीप नाईकवाडी, विनोद आहुजा (आयटी जिओग्राफीज – भारत प्रमुख) नागेश चव्हाण, हरजीतसिंह बारडा, श्रीनिवास बास्सा, सुकुमार आनंदन, सुदर्शन चेल्लप्पा, प्रसाद म्हात्रे इ .कंपनी मान्यवर उपस्थित होते. संगणक कक्षाच्या निर्मितीसाठी विशेष सहकार्य सुशिल शिंगाडे, केशव कुलथे यांचे झाले. घरबुडे, क्षीरसागर, अत्रे, वारघडे, खराडे यांनी कार्यक्रम नियोजनात योगदान दिले. बुर्डे मामा, रमेश कसबे यांनी कार्यक्रम व्यवस्था पाहिली .
उद्घाटन कार्यक्रम पर्यवेक्षिका पंडित. एस. आर. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला बुरुड यांनी सूत्रसंचलन केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here