prabodhini news logo
Home चंद्रपूर महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2025 च्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने चंद्रपूर शहरात गांधी...

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2025 च्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने चंद्रपूर शहरात गांधी चौक येथे आंदोलन

0
91

महाराष्ट्र सरकारने पारीत केलेला जनसुरक्षा विधेयक 2025 हे घटनाविरोधी व लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मुलभूत हक्कास गदा आणणारे आहे. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व्हावी व हुकूमशाही यंत्रणा बळकट व्हावी. हा सरकारचा कुटील हेतू आहे. जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावे याबाबत महाविकास आघाडीच्या वतीने चंद्रपूर शहरात गांधी चौक येथे सरकारविरोधात घोषणाबाजी करून आंदोलन व निर्देर्शने करण्यात आले.
यावेळी काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके शहर अध्यक्ष रामू तीवारी प्रदेश सरचिटणीस ऍड हिराचंद बोरकुटे शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचारे राष्ट्रवादीचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर युवक शहर जिल्हाध्यक्ष कलाकार मल्लारप अल्प संख्याक शहर जिल्हाध्यक्ष बब्बूभाई ईसा आदिवासी सेल शहर जिल्हाधक्ष जनार्दन गेडाम ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल मस्की विधानसभा सभा अध्यक्ष सुरज चव्हाण, समीर खान जिल्हा उपाध्यक्ष , विदयार्थी शहर जिल्हाध्यक्ष परब गिरडकर प्रवीण आरेपल्लीवार, विलास नखाते , सुभाष नांनावरे, नीलखंट येरमे राजेश आसकर, आवेश पठाण इरसात खान शोभा घरडे , लता जांभुळकर. सरस्वती गावंडे सुनंदा महातवे शेंडेताई, तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here