
नम्रता सरदार (रामटेके) मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – महिलांचा कौशल्यविकास व्हावा त्यासाठी रोटरी क्लब चंद्रपूर द्वारा शिवणकला प्रशिक्षण उपक्रमामुळे सक्षमिकरण व्हावे व त्या आत्मनिर्भर व्हाव्यात करिता आम्ही विविध व्यावसायिक प्रशिक्षण सेवा देण्यासाठी पुढाकार घेणार आहोत असे मार्गदर्शन रोटरी अध्यक्ष संदीप रामटेके ह्यांनी प्रशिक्षण प्रारंभ करताना केले.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब चंद्रपूरचे अध्यक्ष संदीप रामटेके, सचिव राजेश गन्नारपवार,अविनाश रघूशे, महेश उचके, नरेंद्र बुरांडे यांची उपस्थिती होती.
विकलांग सेवा संस्था तुळशीनगर,चंद्रपूर येथील आयोजित कार्यक्रमाचे प्रास्तविक नंदा बिहाडे तर आभारप्रदर्शन पूजा चहारे पान्हेरकर ह्यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत राजश्री शिंदे, व इतर प्रशिक्षणार्थ्यांनी केले.
रोटरी क्लबद्वारा प्रशिक्षण सहकार्याबद्दल उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांनी धन्यवाद दिलेत.















