prabodhini news logo
Home जळगांव बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे डॉ. ऐश्वरी राठोड यांची मलकापूर विधानसभा प्रभारी...

बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे डॉ. ऐश्वरी राठोड यांची मलकापूर विधानसभा प्रभारी म्हणून नियुक्ती

0
139

जळगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – डॉ. ऐश्वरी राठोड यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे मलकापूर विधानसभा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करणे. विविध आंदोलन आणि तसेच जनसंपर्क अभियान अंतर्गत डॉ. ऐश्वर्री यश राठोड या नेहमीच कार्यरत असतात. वैद्यकीय व्यवसायाशी निगडित असल्यानंतर जनसंपर्क हा जामनेर तालुक्यामध्ये आहेच आणि तसंच जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे विविध अभियानाद्वारे आपली उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. 30 जुलैला डॉ. ऐश्वर्री यश राठोड यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे “प्रदेश सचिव पदी” निवड झाली असता. प्रशिक्षण शिबिर कार्यशाळा खडकवासला, वोट चोरी स्वाक्षरी अभियान जामनेर तालुका काँग्रेस कमिटी , तसेच विविध सामाजिक उपक्रम जामनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ वाटप प्रदेशाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त असे विविध उपक्रम डॉ.ऐश्वरी राठोड यांनी राबविलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here