prabodhini news logo
Home कारंजा आदिगुंज. मा. ब. संस्था कारंजा येथे गरबा व दांडीया 15 दिवसीय प्रशिक्षण...

आदिगुंज. मा. ब. संस्था कारंजा येथे गरबा व दांडीया 15 दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न

0
230

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – आदिगुंज. मा. ब. संस्था कारंजा द्वारा संचालित जि. एन. डान्स स्टुडिओ प्रस्तुत गरबा व दांडीया 15 दिवसीय प्रशिक्षण शिबिर सीजन 4. कारंजा लाड येथील G.N. dance. जि. एन.डान्स स्टुडिओ तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठया उत्साहात येथील प्रतिष्ठित ठिकाण साई संकुल बायपास मंगरूळपीर रोड व. गणपती मंदिर साडिपुरा कारंजा येथे खास महिलांकरिता विशेष प्राविण्य प्रशिकासह मोठ्या उत्साहाने गरबा व दांडीया प्रशिक्षण दिल्या जात आहे या मध्ये गुजरात मधील नामांकित प्रशिक्षक किरण पुरोहित, दृष्टी पटेल, नवसारी सुरत, अक्षय राऊत गुरु वाशीम महाराष्ट्र बालकृष्ण गौर वापी गुजरात हनी राठोड, अर्पिता मौर्य अहमदाबाद हे महिला प्रशिक्षणार्थींना उत्कृष्ट असे प्रशिक्षण कारंजा येथे देत आहे कारंजा परिसरातील बहुसंख्य महिला व मुली या मध्ये सहभागी होऊन यशस्वी असे प्रशिक्षण घेत आहे व यामध्ये विशेष आकर्षण म्हणून रील स्टार वाशीम ची पियू यांनी या शिबिराला विशेष भेट देऊन सर्व चाहत्यांना आपल्या कलेचे प्रदर्शन करून सर्वांना मंत्रमुघ्ध केले.या कार्यक्रमाचे आयोजक जि. एन. डान्स स्टुडिओ चे संचालक गगन रायसर व नम्रता राठोड यांनी व ग्रुप चे सर्व सदस्य हे अथक घेत आहे दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी उद्घाटन प्रसंगी मंचावर प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून सर्वप्रशिक्षक तसेच ग्रुपच्या शीतल काकडे, रश्मी उज्जेंनकर, ईशा नांदुरकर, शीतल कडेल, पूजा कडेल, अर्चना कदम, वंदना खंडारे, दीक्षा वरघट, प्रणिता दसरे, कविता पाठक, नीता बोनकिले, शीतल वरघट, पायल तिवारी, इत्यादीच्या उपस्थित पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन निकिता पटेल यांनी केले या कार्यक्रमाला जि. एन डान्स स्टुडिओ चे सर्व सभासद उपस्थित राहून सहकार्य केले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here