
शासनाच्या षडयंत्राला केले उघड
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – भंडारा: दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी, त्रिमूर्ती चौक भंडारा येथे भारत मुक्ती मोर्चा च्या सर्व सहयोगी संघटना च्या वतीने हे चार टप्प्यातील चरणबद्ध राष्ट्रव्यापी जनआंदोलन करण्यात आले त्यात राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवरील समस्या च्या निवारण करण्यासाठी आंदोलन करतांना खालील मागण्या करण्यात आल्या
1) सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्या करीता
2) (ओबीसी) आणि सर्व जाती गटांची जाती आधारित जनगणना करणे.
3) आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाचा निषेधार्थ
4) मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध समुदायांच्या संवैधानिक हक्कांचे, सुरक्षिततेचे आणि धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आणि या समुदायांसोबत होणाऱ्या धार्मिक भेदभाव, हिंसाचार आणि छळ आणि मॉब लिंचिंगचा निषेध करण्यासाठी
5) एससी/एसटी/ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण त्वरित लागू करण्या करीता..
6) राष्ट्रीय (नवीन) शिक्षण धोरण २०२० द्वारे लागू करण्यात येणाऱ्या बहुजन विरोधी धोरणे आणि तरतुदींच्या निषेधार्थ व स्मार्ट मीटर च्या आणी अन्य कारणाच्या विरोधात व संविधानाच्या रक्षणासाठी एक दिवशीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते,
जिल्हाधिकारी यांना निवेदन देते वेळी रविदास लोखंडे, सुभाष भिवगडे ,शरयू डहाट ,अंगद कुठारे ,धर्मपाल मेश्राम, भारत बन्सोड , सुभाष नागदेवे, अभय डी रंगारी, विशांत शामकुवर, जितेंद्र चोपकर, मुकेश ठाकरे , कृपाल बागडे ,प्रदीप डहाट , लक्ष्मीशंकर चौधरी, स्नेहा मेश्राम, हर्षा बन्सोड , दीपक वासनिक , असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते , दिलेल्या मागण्या वेळीच पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या 25 सप्टेंबरमध्ये भारतातील 36 राज्यातील 650 जिल्ह्यातील 3 हजार तालुक्यातील 6 लाख गावातील जनतेला घेऊन राष्ट्रव्यापी जेलभरो जनआंदोलन करण्यात येणार आहे असे आमच्या प्रतिनिधी ला अभय डी रंगारी यांनी सांगितले आहे..















