
भारत मुक्ती मोर्चा च्या राष्ट्रव्यापी जनआक्रोश रॅली ला जाहीर समर्थन
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज भंडारा : शासनाने जनतेच्या मागण्या चा विचार न करता तुघलकी निर्णय घेऊन अनेक कायद्यांत बदल केला आहे , त्याचाच एक भाग म्हणून अनावश्यक खाजगीकरण केले आहे , त्यामुळे भारतीय जनतेला अनेक त्रास सहन करावा लागतो , आठ तासाच्या कामाला सरकारने 12 तास केले आहे , आमदार खासदार मंत्री संत्री यांची पेन्शन सुरू ठेऊन कर्मचाऱ्यांना पेन्शन बंद केली आहे ,नोकरी भरती बंद करून कंत्राटी भरती केली आहे , वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या नाही, आरोग्य विषयक समस्या , असंघटीत कामगारांना न्याय नाही, नगरपालिका , महानगरपालिका यांच्या कर्मचारी लोकांच्या अनेक समस्या कडे लक्ष केंद्रित करण्यासाठी व या समस्येवर उपाय योजना राबविणाऱ्या भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेला जाहीर पाठिंबा देण्यासाठी सदर निवेदन देण्यात आले , निवेदन देते वेळी प्रवीण मोटघरे , तेजस्वीनी महाकाळकर , रुपाली ,बोळणे , वैशाली बन्सोड , ऋचा मेश्राम व अनेक कर्मचारी उपस्थित होते..















