
मोजीस परमार विशेष जिल्हा प्रतिनिधी ठाणे
_mojissports@gmail.com
8104170564
मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेत (MBMC) फर्जी स्टॉल परवाना घोटाळा उघड झाला आहे. या प्रकरणात कनिष्ठ अभियंता शैलेश शिंदे यांना निलंबित करण्यात आले असून, भाईंदर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
तपासात असे आढळले की काही जणांनी जुन्या स्टॉल लायसन्सच्या जालीम प्रती तयार करून त्यावरून नवीन लायसन्स मिळवले. या बनावट परवान्यांचा वापर करून भाडेपट्टी आणि जागा नूतनीकरणासाठी अर्ज करण्यात आले.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सही-सिक्क्याही बनावट कागदपत्रांवर वापरण्यात आल्या होत्या. आतापर्यंतच्या तपासात २० ते २४ स्टॉल लायसन्स बनावट असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई सुरू आहे. मनपा प्रशासनानेही चौकशीसाठी विशेष समिती नेमली आहे.















