prabodhini news logo
Home चंद्रपूर कामगार कल्याण मंडळाच्या गटस्तरिय महिला नाट्य स्पर्धेत दोन परसेन्ट नाटक प्रथम

कामगार कल्याण मंडळाच्या गटस्तरिय महिला नाट्य स्पर्धेत दोन परसेन्ट नाटक प्रथम

0
136

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर:-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर विभाग चंद्रपूर गटकार्यालया अंतर्गत ललित कला भवन बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे दि.१६ व १७ सप्टेंबर २०२५ रोजी गटस्तरिय महिला नाट्य स्पर्धा संपन्न झाल्या.
दोन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन परीक्षक व कामगार कल्याण अधिकारी चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे कार्यक्रम अध्यक्षा मा सुनंदाताई श्रीराम पान्हेरकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त, प्रमुख पाहुणे मा. नंदा अशोक बिहाडे अध्यक्षा आनंद यात्री संस्था चंद्रपूर , प्रमुख उपस्थिती मा. श्रीराम पान्हेरकर गुणवंत कामगार तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त, मा.अशोक बिहाडे गुणवंत कामगार, रामेश्वर अळणे कामगार कल्याण अधिकारी चंद्रपूर आणि परीक्षक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

स्पर्धेचे परीक्षण मा. जयदेव सोमनाथे, मा. नूतन देशमुख/ नुतन अजय धवने, मा.विनोद दुर्गपुरोहित यांनी केले.
सदरच्या स्पर्धेमध्ये गटाअंतर्गत नऊ संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कामगार वसाहत सिध्दी मेघे वर्धा नाटकाचे नाव दोन परसेन्ट, व्दितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र पुलगावचे नाटक विवर, तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र उर्जानगर नाटक मनाचा खेळ, उत्कृष्ठ अभिनयामध्ये प्रथम कु. सुविधा झोटिंग, व्दितीय किरण हिवरे, तृतीय उर्मिला भांगडे यांनी तर उत्कृष्ठ दिग्दर्शनमध्ये प्रथम हंसराज ढाले, व्दितीय शितल गवारे, तृतीय सुविधा झोटिंग यांनी पटकावला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर अळणे कामगार कल्याण अधिकारी चंद्रपूर यांनी केले. सूत्रसंचालन देवेंद्र दत्त कल्याण निरिक्षक, ललित कला भवन चंद्रपूर यांनी तर आभार प्रदर्शन किरण उपरे यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गटातील सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला कामगार/ कामगार कुटुंबिय व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here