prabodhini news logo
Home घुग्घुस घुग्घुस शहरात शाळांच्या परिसरात अवैध दारू विक्री – बी.एस.पी.चा निषेध

घुग्घुस शहरात शाळांच्या परिसरात अवैध दारू विक्री – बी.एस.पी.चा निषेध

0
102

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – घुग्घुस शहरात गेल्या काही दिवसांत अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून, ही बाब नागरिकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोकादायक ठरत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळा, जनता स्कूल, प्रियांदर्शनी स्कूल, माऊंट कार्मेल स्कूल आणि जी.डी. गोयंका स्कूल या शैक्षणिक संस्थांच्या जवळपास अवैध दारू विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

विद्यार्थ्यांच्या भविष्यावर या अवैध धंद्याचा विपरीत परिणाम होत असून, पालक व नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.

बी.एस.पी. घुग्घुस शहराच्या ठाम मागण्या :

शाळांच्या परिसरातील सर्व अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी.

अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

शाळा, कॉलेज व धार्मिक स्थळांच्या जवळ भविष्यात असे अवैध धंदे पुन्हा सुरू होणार नाहीत, याची लेखी हमी प्रशासनाने द्यावी.

घुग्घुस शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे (दारू, जुगार, मटका इ.) कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत.

अन्यथा, बी.एस.पी. तर्फे नागरिकांना घेऊन मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here