
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – दि. १७ सप्टेंबर २०२५, स्थानिक सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क अंतर्गत करियर गायडन्स सेल आणि इको प्रो संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये “करिअर मार्गदर्शन कार्यशाळा” आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाथे करिअर अकॅडमी नागपूर येथील प्राध्यापक संजय नाथे उपस्थित होते. प्राध्यापक नाथे सर यांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी तसेच विविध स्पर्धा परीक्षा कशा असतात आणि त्या परीक्षांचा अभ्यास कशा पद्धतीने करावा आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. ममता ठाकूरवार यांनी भूषविले.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इको प्रो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे उपस्थित होते.
याप्रसंगी मंचावर सेवानिवृत्त बीडिओ उद्धव साबळे, अतुल वासुदेव, प्रा. डॉ.जयश्री कापसे, तसेच महाविद्यालयातील करिअर गाईडन्स सेलचे सदस्य डॉ. संजीव निंबाळकर, डॉ.कल्पना कवाडे आणि डॉ. सिद्धार्थ वाकुडे उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन प्राध्यापिका डॉ. कल्पना कवाडे यांनी केले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिद्धार्थ वाकुडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. किरणकुमार मनुरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर प्रा. नाथे सरांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.















