prabodhini news logo
Home कारंजा मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा कारंजा तालुक्यातील धामणीखडी येथून शुभारंभ

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा कारंजा तालुक्यातील धामणीखडी येथून शुभारंभ

0
138

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा तालुक्यातील धामणीखडी येथे दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता येथील कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्रीमती पूनम राणे यांच्या व विस्तार अधिकारी माधव साखरे, संजय भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यामध्ये गावातील सरपंच महादेव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या हस्ते वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा व बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मार्गदर्शनात संबोदतांना गटविकास अधिकारी पूनम राणे यांनी कारंजा तालुक्यातील 91 ग्रामपंचात मध्ये ह्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असून सर्व गावात ह्या योजनेला उत्स्फूत असा प्रतिसाद जनतेमधून मिळतं असल्याचे सांगितले कारंजा तालुक्यातील आठ जिल्हा परिषद सर्कल निहाय संपर्क अधिकारी नेमून यांना प्रोसिडिंग लिहिण्याकरिता सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली व यांच्याकडे एकापेक्षा जास्त गावे असतील त्या ठिकाणी जी प.मराठी शाळेतील मुख्याध्यापक यांचा वर जबाबदारी दिली तसेच ग्रामपंचायत स्तरातील विविध शासकीय नीम शासकीय इतर सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रतिनिधी यांनी ग्रामसभेला उपस्थित राहून आपल्या विभागांतर्गत सर्व योजनाचा लाभ कसा देता येईल कार्यक्रमाची माहिती तसेच अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून विविध योजनेची माहिती दिली ह्या करिता गटविकास अधिकारी तथा प्रशासक पूनम राणे यांनी ग्रामस्थांना गावात आपल्या ग्रामपंचायतीला कसे बक्षीस प्राप्त होतील आणि त्या करिता सुधाषणयुक्त पंचायत स्वनिधी लोकवर्गणी जल समृद्ध स्वच्छ व हरित गाव मनरेगा व इतर योजनेचे अभिसरण लोकसहभाग व श्रमदान गावातील नागरिकांना सर्व सेवा ऑन लाइन पद्धतीने देणे आयुष्यमान भारत कार्ड व दिव्यांग ओळख पत्र करवसुली तक्रार निवारण CCTV बसविणे लेखापरीक्षण दप्तर अद्यावत ठेवणे ग्रामसभा घेणे शाळा सुविधा व अंगणवाडी सुविधा सक्षीमीकरण आरोग्य सेवा स्मशान भूमि व्यायाम शाळा बेघर्रांना घरकुल पात्र लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून देणे बचत गट महिलांना सहभागी करून बँकेचे कर्ज वितरण करण शेतकरी उत्पादक संस्थांमध्ये महिलांचा सहभाग अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीमध्ये पायाभूत सोयी टी. बी. मुक्त गाव इत्यादी सेवा जर ग्रामपंचायतने दिल्या तर गावाला भरपूर असे रकमेच्या स्वरूपात बक्षीस प्राप्त होऊ शकते असे आपल्या भाषणातू पूनम राणे यांनी ग्रामस्थांना सांगितले विस्तार अधिकारी श्री माधवराव साखरे यांनी ही ग्रामस्थांना विविध योजनेची माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्र संचालन ग्रामपंचायती अधिकारी श्री पांडुरंग गव्हाळे यांनी तर आभार सरपंच महादेव खडसे यांनी केले कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here