prabodhini news logo
Home ठळक बातम्या मसुरमधील श्रद्धेचे प्रतीक संतोषीमाता मंदिर समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले

मसुरमधील श्रद्धेचे प्रतीक संतोषीमाता मंदिर समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले

0
70

सातारा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर स्त्री शक्तीचे स्वरूप, स्त्री शक्तीचा महिमा आणि अखंड भाव श्रद्धा आणि धैर्य यांचे साम्य म्हणजेच नवरात्र. महाराष्ट्रातल्या विविध भागात नवरात्र सुरू आहेत. अशा या कालावधीत आपली नितांत श्रद्धा मांडत गेलेली वर्षांन वर्षे चालत आलेल्या परंपरा व आपला अविरत भाव आज पर्यंत संतोषी माता नवरात्र उत्सव समिती मसूर चालवत आलेले आहे. एकजुटीने एक ताकदीने सगळ्यांनी मिळून देवीसमोर मांडलेला जळता प्राणाचा पोथ, मंदिरासमोर असणारी तुळशी सुद्धा आत्मनिर्भरता प्रज्वलित करते, रांगोळी सोबत रंगणारे रंग जीवन रंगवल्यासारखे प्रत्येक रंगातून शिकवण देतात, मांडलेला घट धैर्याचा प्रतीक म्हणून हरु नकोस – लढत राहा हे सांगतो, आणि गाभार्यात बसणारी मूर्ती तर जीवनातील अष्टपैलूंची ओळख करून देते.
साताऱ्यातील मसूर या छोट्याशा गावात हे मंदिर आजही अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक दुरून लोक आपल्या इच्छा आपले भाव आपले प्रेम देवी प्रति प्रकट करण्यासाठी येत असतात. आणि मसूर गावातली ही संतोषी माता आपले चैतन्य व शक्तीने भक्तांना नेहमीच मदत करते. अशा या विचारांनी कु.सायली बाळू ढेबे हिने आपले मसूर ग्रामस्थांच्या वतीने भाव प्रकट करत सर्व भाविकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देत आपले म्हणणे व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here