
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – वर्धा येथे दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी वर्धा येथे केरला येथून 7 सप्टेंबर 2025 रोजी सम्राट अशोक, आंबेडकर, धम्म यात्रा शांती आणि बंधूता केरला दीक्षाभूमी ते दीक्षाभूमी नागपूर पर्यंत धम्म यात्राचे आयोजन करण्यात आले.केरला येथून प्रस्थापित होऊन वर्धा येथे प्रवेश करण्यात आले.त्यांची सम्राट अशोका धम्म यात्रा 1 ऑक्टोंबर रोजी नागपूर पवित्र दिक्षा भूमीवर पोहचणार आहे.यावेळी वर्धा शहरातील प्रत्येक बुद्ध विहार भेट देऊन सम्यक दृष्टी बुद्ध विहार नालंदा नगर वर्धा येथील बुद्ध विहार येथे त्यांच्या टीम चे स्वागत सम्यक दृष्टी बुद्ध विहारा चे अध्यक्ष प्रल्हाद फुले सरांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी पूजनीय भंते व सामाजिक कार्यकर्ते पद्माकर कांबळे, समाज सेवक दिलीपराव वैद्य, टेंभरे, आणि धम्म उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.















