prabodhini news logo
Home ठळक बातम्या महात्मा गांधी जयंती निमित्त ओपन मॅराथाॅन स्पर्धा यशस्वी

महात्मा गांधी जयंती निमित्त ओपन मॅराथाॅन स्पर्धा यशस्वी

0
104

तरूण -तरूणी बरोबर धावल्या ७५ वर्षीय महिला -पुरुष

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

(भंडारा) – गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमीत्य २ ऑक्टोंबर २०२५ ला दिवंगत खेळाडू स्व. गणपत बांते, स्व. श्रीपत बांते, स्व. रवीशंकर भिवगडे, स्व. मंगेश बांते, स्व. पुरुषोत्तम बांते यांचे स्मरणार्थ वैनगंगा स्पोर्टिग्स् क्लब भंडारा च्या वतीने ४६ वी वैनगंगा ओपन मॅरॉथॉन महिला- पुरुष स्पर्धा नुकतीच घेण्यात आली.

दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेची मुख्याधिकारी हरिष मदान, ॲड. मधुकांत बांडेबुचे, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त मोहन दाढी, माजी नगरसेविका वनिता कुथे, सामाजिक कार्यकर्त्या माला बगमारे, मुकेश साकोरे, दिलीप कुथे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.मॅराथॉन स्पर्धेपूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला मार्ल्यापण करून स्पर्धेला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून महात्मा गांधी चौक येथून सुरूवात करण्यात आली.

ही स्पर्धेत दोन गटात घेण्यात आली. त्यात महिला स्पर्धा जी.बी. क्लब खोकरला पर्यंत व पुरुष खुर्शिपार नहरावरून परत रूक्मिणी नगर, ग्राऊंडवर समारोप करण्यात आला. यामध्ये ७५ मुला-मुलींनी भाग घेतला होता.

समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेची मुख्याधिकारी हरिष मदान होते. प्रमुख पाहुणे म्हणून टेनिकॉईट संघटेचे अध्यक्ष ॲड. मधुकांत बांडेबुचे, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त मोहन दाढी, बान्तेताई, माजी नगरसेविका वनिता कुथे, सामाजिक कार्यकर्त्या माला बगमारे, मुकेश साकोरे, दिलीप कुथे उपस्थित होते.

मॅरेथॉन स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. त्यात मुली करिता ५ व मुलांकरिता ११ किलोमीटर ची स्पर्धा होती. त्यात मुलांमध्ये अजित उके (सुरेवाडा), अभिषेक बावने (नागपूर), पराग डोंगरवार (साकोली), सोहम चौधरी (साकोली), अभय मस्के (नागपूर) व मुलींमध्ये प्राची बोंद्रे (भंडारा), वैशाली वंजारी (डोंगरगाव), प्राची पिकलमुंडे (खापा), मेघा खवास केसलवाडा (राघोर्ते), हितेशी चौधरी (भंडारा) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतृर्थ व पाचवा क्रमांक पटकावला आहे. त्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

विशेष आकर्षक म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेत पोलीस पुर्व प्रशिक्षण घेणारे तरूण -तरूणी बरोबर नरेंद्र लांबकाने, संजय सिंग ६१ व दिपाली कराडे, मंजुळा वाघाये व विमल मानापूरे ७५ वर्षीय महिला सुध्दा धावल्या होत्या. मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मृणाल बांडेबुचे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अरुण बांडेबुचे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकर गायधने, अशोक बन्सोड, विलास केजरकर, बेनिवाल चौधरी, जितू हलमारे, अश्विन सेलोकर, अमोल बांडेबुचे, जयंत तांडेकर, विशाल बांते, दिपक राघोर्ते, सुरेश रेहपाडे, सुनिल पंचबुध्दे, नचिकेत बांडेबुचे, गणेश साकोरे व टेनिक्वांईडचे संपूर्ण खेळाडूंनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here