
पद्माकर कांबळे प्रतिनिधी वर्धा – वर्धा शहरातील सिव्हिल लाईन येथे महात्मा गांधी यांच्या 156 व्या जयंती दिनानिमित्य कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते पद्माकर कांबळे यांनी केले होते.सर्व प्रथम महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळाला पद्माकर कांबळे यांनी पुष्प हार घालून अभिवादन केले .त्यानंतर महात्मा गांधी यांच्या 156 व्या जयंती दिनानिमित्त जयंती जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यानंतर पद्माकर कांबळे यांनी गीत सादर करताना म्हणाले,”करूया साजरी आज जयंती बापू गांधीची ठेऊया आठवण जयंती दिनी त्यांच्या कार्याची.”यावेळी गांधी पुतळा परिसरातील गांधी प्रेमी यांनी टाळ्या वाजवून पद्माकर कांबळे यांचे मनोबल वाढविले.यावेळी त्यांना साथसांगत समाजसेवक नजीर भाई शेख, मुकुंदा कळसकर यांनी दिली.















