prabodhini news logo
Home कोरची कोरची आश्रय शाळेत गोंडवानाची विरांगना राणी दुर्गावती जयंती उत्साहात साजरी

कोरची आश्रय शाळेत गोंडवानाची विरांगना राणी दुर्गावती जयंती उत्साहात साजरी

0
230

कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरची येथील बहुउद्देशीय सभागृहात गोंडवाना राज्याची आदिवासी विरांगना राणी दुर्गावती यांची जयंती ५ आक्टोंबर रोज रविवारला साजरी करण्यात आली.
भारताच्या इतिहासातील शूर विरांगणा राणी दुर्गावती यांनी आपल्या शौर्य, पराक्रम व बलिदानाचे गौरवशाली इतिहास आदिवासी समाजाला व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी राणी दुर्गावती यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम,वेशभूषा, निबंध स्पर्धा, चित्रकला,भाषण इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत करण्यात आले.
“शूर विरंगणा राणी दुर्गावती यांनी मुघल साम्राज्याविरुद्ध लढा देऊन गोंडवानाचे रक्षण केले आणि त्यांच्या शौर्यामुळे त्या आजही भारतीय आदिवासी महिलांसाठी धैर्य व स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्याचा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे” असे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक सर यांनी आपल्या अध्यक्षतेही भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक होते. प्रमुख उपस्थिती शाळेतील जेष्ठ शिक्षक भैयालाल कुरसंगे, अरुण कायंदे, हरिश कामडी, राहुल अंधारे, अभिमन्यू वाटगुरे, प्रमोद शंभरकर, धनश्री परतेती,गुरुराज मेंढे, कुणाल गोवर्धन, मनोज आचार्य, डाकराम ठाकरे, गीता राऊत, सुषमा आंबोणे, संतोष सहारे, अधिक्षक नितीन दुधे, सीमा कुरेकार तथा शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज आचार्य यांनी केले व अरुण कायंदे यांनी केले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here