
नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्याचा मंत्री प्रताप सरनाईक यांचा विश्वास!
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
8104170564
mojissports@gmail.com
मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदरमधील जुना इमारत पुनर्विकास, ७९-ए प्रक्रिया, डीसी कंवर्जन, ७/१२ उतारा आणि सोसायटी नोंदणी यासंबंधी नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित अडचणींवर तात्काळ मार्गदर्शन मिळावे यासाठी आज भव्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. शेकडो नागरिक, सोसायटी पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “नागरिकांना पुनर्विकास प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे हे माझे कर्तव्य आहे. शासन व प्रशासनाचे दरवाजे नागरिकांसाठी सदैव खुले आहेत. योग्य ते न्याय लवकरात लवकर मिळेल.”
ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, उपनिबंधक, तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. नागरिकांनी आपली समस्या मांडली, तर अधिकारी तत्काळ उपाय सुचवून मार्गदर्शन केले.
या शिबिरामुळे मीरा-भाईंदरमधील पुनर्विकास प्रक्रियेला गती मिळणार असून, नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवले जातील. तसेच अशाप्रकारच्या मार्गदर्शन शिबिरांना भविष्यात नियमितपणे आयोजन करण्याचे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले.















