
उर्वरित निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन!
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
8104170564
mojissports@gmail.com
मीरा-भाईंदर : गेल्या १६ वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरासाठी प्रतीक्षेत असलेल्या जनता नगर आणि काशी चर्च परिसरातील रहिवाशांना अखेर दिलासा मिळाला आहे. बीएसयूपी (Basic Services for Urban Poor) योजनेअंतर्गत घर मिळविण्यात अडचणी निर्माण झाल्याने नागरिकांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार मा. ना. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली.
शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत नागरिकांनी आपल्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. मंत्री सरनाईक यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत, उर्वरित निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
ते म्हणाले, “बीएसयूपी योजनेतील एकही पात्र कुटुंब घराविना राहणार नाही. मी स्वतः निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा करून महानगरपालिकेला तातडीने निधी मिळवून देईन.”
या सकारात्मक प्रतिसादामुळे रहिवाश्यांमध्ये दिलासा आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.















