
वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – देवळी/वर्धा – तालुक्यातील गौळ येथे बौद्ध विहारांमध्ये आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025 ला दुपारी 2 वाजता वर्षावास दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक नालंदा अकॅडमीचे संचालक माननीय अनुप कुमार सर, तसेच नारंजे साहेब, व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जारुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नालंदा अकादमीचे संचालक अनुप कुमार सर यांनी विद्यार्थ्यांना व नालंदा अकॅडमीचे कार्याची माहिती दिली. तसेच नरांजे यांनी आपले विद्यार्थ्या संदर्भात गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जारुंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रबोधिनी न्यूज चैनल वर्धा जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कांबळे व त्यांचे सहकारी विलास सोगे, दिलीप वैद्य समाजसेवक दशरथ भुजाडे ,यांच्या हस्ते अनुप कुमार सर यांचे शाल व पंचशील टॉवेल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी गौळ सर्कल परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने बुद्ध विहारांमध्ये उपस्थित होते. तसेच गौळ परिसरातील बुद्ध उपासक व उपाशीकांनी नालंदा अकादमी ला धम्मदान देण्यात आले. यावेळी उपस्थित कमलाकर वाघमारे, प्रल्हाद गोटे, भीमराव रूपचंद कांबळे, सुमेध शेलकर, राहुल थूल, विजय जारूंडे, भूषण थूल, स्वप्निल ओरके, राहुल मोडक, हंसराज शेलकर, जनार्दन बेले, जयेंद्र गोटे, दिलीप कांबळे, सचिन कांबळे, सिद्धांत वाळके, नारायण मोडक, शुद्धधन कांबळे, आकाश चुनारकर, गंगाधर मुरारकर, वसंता भोंगाडे, महेंद्र गोटे, परेश शेलकर, शेखर लोहवे, कुणाल मोडक, विशाल मोडक, अमर पाटील, खटेश्वर कांबळे, निलेश कांबळे, आनंदा वाघमारे, सम्राट कांबळे, रोहित वानखेडे, बंडू लामसोंगे, अजय कांबळे, नरेंद्र गोटे,नीलेश थूल, प्रताप दोडके, तुकाराम लोहवे शंकर लोहकरे, विशाल भगत, विराग भगत, विलास कांबळे ,नितीन शेलकर, पवन नामदार , सुमित कांबळे, मंगेश कांबळे इत्यादी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.















