
१८ ते २५ ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश – नवे तंत्रज्ञान जाणून घेण्याची अनोखी संधी
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
8104170564
mojissports@gmail.com
मीरा-भाईंदर : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मीरा-भाईंदरकरांसाठी अभिमानाची बातमी! उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री मा. ना. प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल १८० कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन’ मीरा-भाईंदरमध्ये उभारण्यात आले आहे.
हे भव्य कलादालन १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी दिवाळीतील खास भेट
दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान १८ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी किड्स झोन विशेष खुला राहणार आहे.
येथे एआय व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित खेळ आणि प्रदर्शन विद्यार्थ्यांना अनुभवता येतील.
या कालावधीत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार असून, त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
मंत्री सरनाईक म्हणाले,
> “विद्यार्थ्यांना विज्ञान आणि नवतंत्रज्ञानाची ओळख करून देणे, तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.”
बाळासाहेब ठाकरे यांचा होलोग्राम
त्यांच्या जीवनप्रवास, विचारधारा आणि शिवसेनेच्या इतिहासावर आधारित प्रदर्शनं
डिजिटल इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले, मल्टिमिडीया, ऑडिओ-व्हिज्युअल अनुभव
अॅम्फीथिएटर, ई-लायब्ररी, संगीत केंद्र, संग्रहालय, कॉन्फरन्स हॉल, स्टडी झोन
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी विशेष ‘स्टडी झोन’
ज्येष्ठ नागरिकांसाठी जुन्या गाण्यांचा संग्रह
सौरऊर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, मिनी गार्बेज रीसायकलिंग यांसारख्या पर्यावरणपूरक सुविधा
या कलादालनात कला, संस्कृती आणि तंत्रज्ञान यांचा संगम एकाच छताखाली अनुभवता येणार आहे मंत्री सरनाईक यांची प्रतिक्रिया
“स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन हे महाराष्ट्रातील पहिले असे कलादालन आहे जे बाळासाहेबांच्या नावाने उभारले गेले आहे, आणि तेही मीरा-भाईंदरमध्ये!
हे कलादालन म्हणजे कला, संस्कृती आणि नव्या पिढीच्या सर्जनशीलतेला वाव देणारे केंद्र आहे.
मीरा-भाईंदरकरांना आता काळा घोडा फेस्टिव्हलला किंवा मुंबईत इतरत्र जाऊन कलेचा आनंद घ्यावा लागणार नाही — कारण तसाच अनुभव आपल्या शहरात मिळणार आहे.
दिवाळीच्या निमित्ताने ही माझ्याकडून नागरिकांना दिलेली खास भेट आहे.”















