prabodhini news logo
Home ठळक बातम्या ठाणे जिल्ह्यात मीरा-भाईंदर महानगरपालिकेची पशुगणनेत सर्वोत्कृष्ट कामगिरी!

ठाणे जिल्ह्यात मीरा-भाईंदर महानगरपालिकेची पशुगणनेत सर्वोत्कृष्ट कामगिरी!

0
105

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क

मीरा-भाईंदर : ठाणे जिल्ह्यातील पशुगणनेत मीरा-भाईंदर महानगरपालिकेने सर्वोत्कृष्ट कामगिरी करून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील एकूण ६ महानगरपालिका आणि २ जिल्हा परिषद क्षेत्रांमध्ये झालेल्या या स्पर्धात्मक गणनेत मीरा-भाईंदर महानगरपालिकेने उल्लेखनीय यश मिळवले.

महानगरपालिकेच्या आयुक्त व तसंच अतिरिक्त आयुक्त (प्रशासन) राजीवनील अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली ही गणना पूर्णत्वास नेण्यात आली.

ही गणना कोकण विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि महानगरपालिकेच्या स्वतंत्र आराखड्यानुसार करण्यात आली. संपूर्ण गणना प्रक्रिया डिसेंबर २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत राबवण्यात आली. या काळात ४७ गणक चालक आणि ६ निरीक्षकांनी प्रभावीपणे काम पार पाडले.

संपूर्ण शहरात शंभर टक्के (१००%) गणना पूर्ण करण्यात आली असून, विविध प्रकारचे प्राण्यांचे नोंदणी व वर्गीकरण यशस्वीरित्या करण्यात आले. यात शहरी वस्त्या, गावे, झोपडपट्ट्या, बंधारे, बाजारपेठा आणि कारखान्यांचा समावेश होता.

या उपक्रमासाठी महानगरपालिकेला राज्य शासनाच्या वतीने ३५ लाख रुपयांचे विशेष प्रोत्साहन पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त राजीवनील शर्मा (भा.प्र.से.) म्हणाले,

“ही कामगिरी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रगतिशील आणि परिणामकारक प्रशासनाची साक्ष देणारी आहे. भविष्यातील सर्व उपक्रमांसाठी ही यशस्वी मोहीम प्रेरणादायी ठरेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here